Ad will apear here
Next
इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग
पैशाची गरज आज पदोपदी भासते. पैशाची आवक मर्यादित असली, तरी त्याचे योग्य नियोजन केले, तर गाठीला पैसा राहतो. यासाठी गुंतवणुकीचे नियोजन व त्यानंतर त्यात वाढ कशी होईल याबाबत अंकित गाला आणि खुशबू गाला यांनी ‘इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग’मधून मार्गदर्शन केले आहे.

सुरुवातीला बचत व गुंतवणुकीचे महत्त्व समजावून दिले आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या विम्याची गरज व त्याचे प्रकार याबाबत सांगितले आहे. लवकरात लवकर गुंतवणूक करण्याचे फायदे, एकाच योजनेत जास्त गुंतवणूक न करता त्याचे विविध पर्यायांमध्ये वर्गीकरण करणे याबाबत प्राथमिक माहितीही दिली आहे.

गुंतवणुकीसाठी बॅंक डिपॉझिट व त्याचे प्रकार, पीपीएफ, एनएससी, एसआयपी, म्युच्युअल फंड, शेअर्स, आयपीओ, सोने-चांदी, आरबीआय बाँड, कंपनी फिक्स्ड डिपॉझिट, युलिप, राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग योजना, कमोडिटीमधील गुंतवणूक, रिअल इस्टेट, मुलांच्या भवितव्यासाठी व सिनिअर सिटीझनसाठीची गुंतवणुकीबद्दल यात माहिती आहे. याशिवाय रिव्हर्स मॉर्गेज, सिबिल स्कोअर, सिक्युरिटीवर कर्ज, टॅक्स डिडक्शन, रिटर्न फाइल करणे, मृत्युपत्र व वारस नेमणे आदी गोष्टीही यात आहेत.                

पुस्तक : इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग
लेखक : अंकित गाला, खुशबू गाला
प्रकाशक : बजिंग स्टॉक पब्लिशिंग हाउस
पाने : २४२
किंमत : २७५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZYSBW
Similar Posts
ईन्वेस्टमेंट प्लानिंग (मराठी) कोणत्याही स्तरातील व्यक्तीसाठी आर्थिक नियोजन ही आवश्यक बाब असते. अंकित गाला आणि खुशबू गाला यांनी या पुस्तकात पैशांची गुंतवणूक का आणि कशी करावी, या संबंधी सांगितले आहे. जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा यांचे महत्त्व, घराचा इन्शुरन्स, आजारपण यासाठीची गुंतवणूक, अॅसेट अलोकेशन यांची माहिती दिली आहे.
इंट्राडे ट्रेडिंगची ओळख हल्ली शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे कल वाढू लागला आहे. डे ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. डे ट्रेडिंग म्हणजे नेमके काय याची कल्पना गुंतवणुकदारांना यावी यासाठी जितेंद्र गाला आणि अंकित गाला यांनी ‘इंट्राडे ट्रेडिंगची ओळख’मधून सर्व माहिती दिली आहे. सिक्युरिटी मार्केटची
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून
तुमच्या यशाची गुरुकिल्ली बऱ्याचदा दुसऱ्याच्या अनुभवावरून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. एन. भट्टाचार्य यांनी या पुस्तकात, तर आपल्यासमोर थॉमस एडिसन, धीरूभाई अंबानी, वॉल्ट डिस्नी अशा थोरांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांची वाटचाल, परिश्रम यांविषयी सांगितले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language